PM SVANidhi Yojana: रु.50,000 पर्यंत कर्ज , लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी.

PM SVANidhi Yojana भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय(MoHUA) तसेच वित्तीय सेवा विभाग (DFS)ची एक योजना आहे, या अंतर्गत भारतामधील पथविक्रेत्यांसाठी कर्ज दिले जाते तेही कारण मुक्त खेळते भांडवल च्या स्वरूपात या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला व्याज अनुदान सुद्धा मिळते सरकारकडून डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना औपचारिक स्वरूप देण्याचे कार्य या योजनेद्वारे करण्यात येते.या (PM SVANidhi Yojana) योजनेचे उद्दिष्ट रस्त्यावरील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आहे, ही योजना 1 जून 2020 रोजी केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून सुरू करण्यात आली होती कोविडच्या दरम्यान बऱ्याचश्या रोड विक्रेत्यांना आर्थिक टंचाईमुळे आपला व्यवसाय बंद करावा लागला याच बाबींकडे लक्ष देऊन त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरळीत सुरू करण्यात व त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्ना साठी ही योजना सुरू करण्यात आली.या योजनेची मुदत संपली असता भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने  प्रधानमंत्री  पथ  विक्रेते आत्मनिर्भर निधी योजनेची पुनर्रचना आणि मुदत वाढ करण्यासाठी मंजुरी दिली आहे या मुदत वाढीमध्ये 31 डिसेंबर 2024 पासून ते 31 डिसेंबर 2030 पर्यंत केले आहे या योजनेसाठी एकूण 7332 कोटी रुपयांचा खर्च सुनिश्चित करण्यात आला आहे. या (PM SVANidhi Yojana) योजनेअंतर्गत १.१५ कोटी पत विक्रेत्यांना भांडवल स्वरूपात कर्ज देण्याचा उद्देश आहे ज्यामध्ये 50 लाख नवीन लाभार्थ्यांना समाविष्ट केले आहे, या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी ठेलेवाले,फेरीवाले,रेडीवाले आणि लहान मोठ्या विक्री व्यवसायात असलेले नागरिकांचा समावेश आहे.

PM SVANidhi Yojana लाभ:

  • विना तारण कर्ज: या योजनेमध्ये लाभार्थीला कर्जासाठी कुठलेही तारण ठेवण्याची गरज नसते,तसेच कुणाच्या हमीची गरज नसते.
  • व्याजावर सवलत: यायोजनेमध्ये वेळेवर किंवा वेळेच्या अगोदर हप्ता भरल्यास 7 टक्के अनुदान मिळते,व ते अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होते.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना खेळते भांडवल कर्ज मिळते यामध्ये खालील प्रमाणे सुमारे तीन टप्प्यांमध्ये कर्ज दिले जाते.
  •  पहिला टप्पा: पहिल्या टप्प्यामध्ये15 हजार पर्यंत कर्ज दिले जाते व ते फेडण्यासाठी 12 महिन्याचा कालावधी दिला जातो.
  • दुसरा टप्पा:दुसऱ्या टप्प्या मध्ये 25 हजार पर्यंत कर्ज दिले जाते  आणि त्याची परतफेड करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिला जातो.
  • तिसरा टप्पा: तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 हजार पर्यंत कर्ज दिले जाते आणि परतफेड करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी दिला जातो.
  •  डिजिटल कॅशबॅक : रस्त्यावरील विक्रेत्यांना डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी शंभर रुपये पर्यंत प्रतिमाह कॅशबॅक देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात येते,(वार्षिक 1200 रुपये पर्यंत कॅशबॅक)
  •  क्रेडिट स्कोर सुधारणा:कर्ज वेळेवर परतफेड केल्यास क्रेडिट स्कोर सुधारण्यास मदत मिळते व कर्जाचे लिमिट ही वाढते.
  • दंड शुल्क: या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क प्रोसेसिंग फी लागू नाही व तसेच मुदतपूर्व परत फेढीचे कोणतेही दंड शुल्क लागू होत नाही,ज्यामुळे लाभार्थी विक्रेते कोणत्याही इतर शुल्का शिवाय कर्ज मुदतपूर्वी मंजूर करू शकतो

व्याजावरील सवलत(Interest Subsidy):

यायोजनेमध्ये वेळेवर किंवा वेळेच्या अगोदर हफ्तेची परत फेड केल्यास वार्षिक 7% व्याजावरती अनुदान मिळते. तसेच कर्जमर्यादा वाढत जाते.

पात्रता:

  • PM SVANidhi Yojana या योजनेमध्ये शहरी भागातील कार्यरत असलेल्या खरोखर गरजवंत पथ  विक्रेत्यांना लक्षात घेऊन त्यांच्यासाठी पात्रता निकष तयार करण्यात आले आहे.
  • ओळखपत्र आणि प्रमाणपत्र: शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेने पथ विक्रेत्यांसाठी जारी केलेल्या (यू. एल. बी.)वैध विक्री प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र असलेल्या पथविक्रेते अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
  • कागदपत्र नसलेले सर्वेक्षण केलेले पथविक्रेते: ज्यांना अद्याप विक्री प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र जारे झालेले नाहीत परंतु अधिकृत सर्वेक्षणात ओळखल्या गेलेल्या पथ विक्रेत्यांन्ना या योजनेसाठी पात्र ठरवले जाऊ शकते.
  • शहराजवळील परिसर: ग्रामीण किंवा शहराजवळील आसपासच्या विकास क्षेत्रामधून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भागाच्या हद्दीमधील विक्रेते सुद्धा आवश्यक असलेल्या शिफारस पत्रासह पात्र ठरू शकतात.
  • शिफारस पत्र: सर्वेक्षणानंतर विक्री सुरू केलेली विक्रेते किंवा सर्वेक्षणातून वगळलेले  विक्रेते ज्यांना ulb कडून शिफारस पत्र मिळाल्यास या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
  • उच्च कर्ज :ज्या विक्रेत्यांनी अगोदरच्या कर्जाची वेळेवर परत फेड केल्यास ते  पुढील कर्ज मिळवण्यासाठी पात्र ठरतात,तसेच अनुदान सहाय्यसाठी त्यांची स्थिती उंचावली जाते. 

कोण अर्ज करू शकते:

या PM SVANidhi Yojana योजने मध्ये रस्त्यावरील किरकोळ व्यापार करणाऱ्या काही घटकांचा समावेश होतो तो खालील प्रमाणे

  • ठराविक ठिकाणी बसणारे विक्रेते: चहा,नाश्ता व इतर खाद्य पदार्थांची गाडी लावणारे विक्रेते.
  • रस्त्याच्या कडेला ठराविक ठिकाणी बसून माल विकणारे विक्रेते जसे की, भाजीवाला, फळे वाला इत्यादी…
  • चपला कपडे स्टेशनरी आणि शोभेच्या वस्तू विकणारे विक्रेते.
  • फिरते विक्रेते:पायी फिरून किंवा हातगाडीवरून वस्तू विकणारे पथविक्रेते, सायकल रिक्षा मोटरसायकल इतर वाहनांवरून विकणारे पथविक्रेते.
  • सेवा देणारे: केस कापणारे न्हावी, बूट चप्पल शिवणारा चांभार,कुंभार,पीठ गिरणी व्यवसाय,वृत्तपत्र विकणारे पुस्तके विकणारे.
  • रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे: पाणीपुर,भेळ व इतर ठेल्यावाले.
  • कारागीर किंवा हस्तकलेवाले: हस्तकलेमधन बनवलेल्या वस्तू चे उत्पादन करणारे.

PM SVANidhi Yojana कागद पत्रे:

  1. पहिल्या कर्जासाठी:
  2. ओळखपत्र
  3. विक्रीप्रमाणपत्र
  4. शिफारस पत्र
    दुसऱ्या कर्जासाठी:
    पहिले कर्ज बंद करण्याचा दस्तऐवज.

केवायसी कागदपत्रे:

  1.  आधार कार्ड
  2. मतदान कार्ड
  3. मनरेगा कार्ड
  4. पॅन कार्ड
  5. वाहन चालवण्याचा परवाना

शिफारस पत्र मिळवण्यासाठी:

  1. बँक पासबुक/ खाते विवरण .
  2. सदस्यत्वाचा कोणताही पुरावा/ सदस्यत्व कार्डाची प्रत.
  3. विक्रेता असल्याचा दावा सिद्ध करणारा कोणताही दस्तऐवज.
  4. यु एल बी साठी केलेले विनंती पत्र.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

पीएम स्वानिधी योजनेचा(PM SVANidhi Yojana) अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी खालील दिलेल्या सुलभ व सोप्या स्टेपचा वापर करा.
 स्टेप 1: पी एम स्वनिधि योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
https://pmsvanidhi.mohua.gov.in/  योजनेचे अधिकृत पोर्टल आहे,याला लॉगिन करा.
स्टेप 2:पडताळणी मोबाईल ओटीपी पडताळणी:
  तुमच्या मोबाईल नंबर वरून लॉग इन करून मिळालेल्या ओटीपी चे पूर्णपणे पडताळणी करून लॉग इन करा, आणि योग्यरीत्या कॅपचा भरा आणि ॲप्लीकेशन लॉग इन प्रक्रिया पूर्ण करा. 
स्टेप 3: विक्रेता तपशील निवडा:
तुमची विक्रेता श्रेणी निवडा आणि तुमचा सर्वेक्षण क्रमांक SRN (Survey Reference Number) प्रविष्ट करा,असे केल्यास सर्वेक्षण जुळण्यास मदत होईल.
स्टेप 4:अर्ज फॉर्म भरा:
अर्ज फॉर्म मध्ये वैयक्तिक माहिती भरुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व सोबत बँक तपशील टाका व सादर (submit) करा.
टीप: अर्ज सादर करण्या अगोदर भरलेली माहिती पुन्हा तपसा.

निष्कर्ष :

पीएम स्वनिधी योजना (PM SVANidhi Yojana) ही लहान विक्रेत्यांसाठी सोप्या पद्धतीने खेळते भांडवल कर्ज मिळवण्याची उत्तम संधी आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

हेल्पलाइन (मदत हवी असल्यास):Toll Free Number: 1800 11 1979
वेळ: सोमवार ते शनिवार (9:30 AM – 6 PM)

स्टँड अप योजनेची माहीती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वाचा

पीएम स्वनिधी योजना म्हणजे काय?

पीएम स्वनिधी योजना (PM SVANidhi Yojana) ही एक खेळते भांडवल निर्माण करून देणारी सरकारी योजना आहे,जी शहरी पथविक्रेत्यांना, विशेषतः कोविड-१९ महामारीमुळे झालेल्या पीडितांना,त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास आणि वाढविण्यात मदत करण्यासाठी तारण-मुक्त खेळते भांडवल कर्ज देते.

पीएम स्वनिधी कर्जाचा फायदा मिळवण्यासाठी मोबाईल नंबर आधारशी जोडणे आवश्यक आहे का?

होय,पीएम स्वनिधी योजना (PM SVANidhi Yojana) अंतर्गत कोणत्या कर्जाचा लाभ मिळण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी अधिकृत मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

PM SVANidhi मध्ये किती कर्ज मिळते?

सुरुवातीला ₹10,000 पर्यंत कर्ज दिले जाते. वेळेवर परतफेड केल्यास पुढील टप्प्यात जास्त कर्ज मिळू शकते.

ऑफलाईन अर्ज करता येतो का?

हो, तुम्ही CSC सेंटर, नगरपालिका कार्यालय किंवा बँक शाखेत जाऊन ऑफलाईन अर्ज करू शकता.

कर्जाची रक्कम कशी मिळते?

अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते.

Leave a Comment