Stand-Up India Scheme 2026 या योजने अंतर्गत व्यापार (Trading), उत्पादन (Manufacturing), सेवा (Services) तसेच शेती उपयुक्त (Agriculture Allied) क्षेत्रांमध्ये नवीन (Greenfield) व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक कर्ज उपलब्ध करून देते.जर व्यवसाय एखाद्या कंपनी, पार्टनरशिप किंवा इतर संस्थेमार्फत सुरू केला जात असेल, तर त्या व्यवसायामध्ये किमान 51% हिस्सा आणि नियंत्रण हे SC/ST किंवा महिला उद्योजकांकडे असणे अनिवार्य आहे.
Stand-Up India Scheme 2026 योजनेची उद्दिष्टे:
- उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन: अनुसूचित जाती (SC),अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उद्योजकांना नवीन उद्योग/व्यवसाय (Greenfield Enterprise) स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- रोजगार निर्मिती:स्वत:चा व्यवसाय सुरू करून,इतरांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे.
- आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे:समाजातील मागास वर्गीय जाती तसेच आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या महिला वर्गाला समाजाच्या प्रवाहात आणून त्यांना आर्थिक बाजूने सक्षम बनवणे.
- बँक कर्ज: भारतामधील सर्व बँक शाखेमधून किमान एक महिला आणि SC/ST व्यावसईकांना 10 लाख ते 1 कोटी पर्यंत कर्ज मिळऊन देण्यास सरकारकडून मदत.
- उत्पादन आणि व्यापार विकासात मदत: उत्पादन, सेवा किंवा व्यवसाय क्षेत्रात नवीन उपक्रम सुरू करणे.
योजनेचे फायदे:
- या Stand-Up India Scheme योजने अंतर्गत लाभार्थी ला फक्त कर्ज पुरवले जात नाही, तर त्यांना स्वत:चा संपूर्ण नवीन व्यवसाय उभारण्यासाठी सरकार कडून आर्थिक सहाय्यता दिली जाते.
- या योजने अंतर्गत नवीन उद्योजकाला 10 लाख ते 1 कोटी रुपये कर्ज सुविधा दिली जाते.
- या योजने मध्ये लाभार्थीला कोणते ही प्रकारचे वस्तु किंवा मालमत्ता गहाण ठेवल्या शिवाय क्रेडिट गॅरंटी फंड(CGFSIL/CGFMU) द्वारे कर्ज दिले जाते.
- महिला, SC आणि ST वर्गातील व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन महिला आणि SC/ST सक्षमीकरण होण्यास मदत.
- लाभार्थीला कर्ज देण्याव्यतिरिक्त त्यांना व्यवसायाची योजना /आराखडा तयार करण्यास मदत व तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी मार्गदर्शन.
- कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेकडून कर्ज धारकाला 7 वर्षाचा मोठा कालावधी मिळतो, यामध्ये त्याला 18 महिन्यापर्यंतचा मोरेटोरियाम कालावधी सुद्धा मिळू शकतो.
- व्यवसाय जर भागीदारी (पार्टनर)मध्ये असेल तर त्यामधील महिला किंवा SC/ST उद्योजकाला 51 टक्के वाटा मिळण्याची तरतूद.
Stand-Up India Scheme पात्रता:
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
- व्यवसाय नवीन (Greenfield)असणे आवश्यक.
- अर्जदार हा पुरुष असल्यास तो SC/ST वर्गातील असावा.
- अर्जदार चे कोणत्याही बँकेत कर्ज थक बाकी नसावी.
- उद्योजकाचे क्षेत्र उत्पादन,सेवा किंवा व्यापार असणे हे अनिवार्य आहे.
- बहुसंख्यांक हिस्सेदारी असणे आवश्यक(अनुसूचित जाती आणि जमाती किंवा महिला उद्योजकांकडे कमीत कमी 51 टक्के व्यवसायाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे.)
आवश्यक कागदपत्रे:
- ओळखेचा पुरावा: आधार कार्ड ,पॅन कार्ड,मतदार ओळखपत्र (Voter ID),पारपत्र,ड्रायव्हिंग लायसन्स.
- रहिवाशी पुरावा:टेलिफोन बिल,अलीकडील वीज बिल,पासपोर्ट,मालमत्ता कर पावती,पारपत्र,मतदान कार्ड.
- व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा:जर व्यवसाय जागा भाडे तत्वावर असल्यास भाडे करारनामा नोंदणी प्रमाणपत्र (Rent Agreement) आवश्यक.
- अर्जदार चे कोणत्याही बँकेत कर्ज थक बाकी नाही याचा पुरावा.
- जात प्रमाणपत्र: जर अर्जदार SC/ST श्रेणीतील असेल तर त्यास जातीचे प्रमाण पत्र.
- भागीदारी डीड:जर व्यवसाय भागीदारी मध्ये असेल तर भागीदारी डिड(partnership deed)आणि जर कंपनी असल्यास असोसिएशन चे लेख(MOA) व मेमोरडॅम.
- GST नोंदणी: व्यवसायाची उलाढाल मर्यादेपेक्षा जास्त असल्यास GST प्रमाणपत्र.
- व्यवसाय नोंदणी: शॉप ॲक्ट लायसन्स (गुमास्ता), उद्योग आधार (Udyam Registration) किंवा कंपनी नोंदणी प्रमाणपत्र.
- आयकर परतावा (ITR): गेल्या १ ते ३ वर्षांचा आयटी रिटर्न (जर भरला असेल तर).
- प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे प्रमाणपत्र: जर तुमचा व्यवसाय उत्पादन क्षेत्रातील (Manufacturing) असेल आणि त्यातून प्रदूषण होत असेल, तर संबंधित विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC).
- समूहातील इतर कंपन्यांचे मागील तीन वर्षांचे बॅलन्स शीट तपशील, उपलब्धतेनुसार.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:
- तुमच्या जवळच असलेल्या अधिकृत अनुसूचित व्यावसायिक बँकेच्या शाखेला भेट द्या.
- आपल्या जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व्यवस्थापकाशी संपर्क साधने.
- अर्जांमध्ये संपूर्ण माहिती भरून अर्ज आवश्यक कागदपत्रासह जिल्हा व्यवस्थापकांकडे सादर करावे.
- संबंधित बँकेचे अधिकारी अर्ज आणि कागदपत्रे पडताळणीस करून कर्ज प्रक्रियेस मदत करतील.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
- Stand-Up India Scheme च्या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्या.
- तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणाची माहिती भरा-राज्य, जिल्हा आणि शहर.
- श्रेणी निवड करा-अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा महिला, लागू असल्यास तुमचा किमान 51 टक्के वाटा असल्याचे स्पष्टीकरण करा.
- तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती भरा जसे की, व्यवसायाचे स्वरूप अपेक्षित कर्जाची रक्कम, व्यवसायाची वर्णन, जागेची माहिती.
- तुमच्या पूर्वीच्या व्यवसायामधील असलेला अनुभव आणि कार्यकाळ सांगा.
- तुम्हाला मदतीची किंवा अतिरिक्त सहाय्य सेवांची गरज आहे का? याची नोंदणी करा.
- आपली वैयक्तिक माहिती भरा-व्यवसायाचे स्वरूप संस्थेचे नाव आणि संपर्क.
- आपला अर्ज सादर करण्यासाठी”नोंदणी करा”या शब्दावर त क्लिक करा.
- नोंदणी केल्यानंतर कर्जाची पुढील कारवाई करण्यासाठी बँकेचे अधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील.
Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana:नवीन सरकारी योजना 2026.
Stand-Up India योजना काय आहे?
Stand-Up India Scheme सरकारची योजना आहे जी SC/ST आणि महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹10 लाख ते ₹1 कोटीपर्यंत कर्ज देते.
या योजनेसाठी पात्रता काय आहे?
अर्जदार SC/ST किंवा महिला असावी आणि नवीन व्यवसाय सुरू करायचा असावा.
Stand-Up India Scheme साठी कागदपत्रे कोणती लागतात?
आधार कार्ड, PAN कार्ड, व्यवसाय योजना, बँक तपशील इत्यादी आवश्यक आहेत.
कोणत्या बँका कर्ज देतात?
सर्व प्रमुख बँका जसे SBI, Bank of Baroda, PNB या योजनेत सहभागी आहेत.
कर्जाचा व्याज दर किती असेल?
या योजनेमध्ये fixed interest rate नसतो,तो बँकेनुसार बदलतो,संबंधित बँकेच्या MCLR दरावर आधारित असतो, जो सामान्यतः 8% ते 12% दरम्यान असतो
स्टँड-अप इंडिया योजना आणि स्टार्ट अप इंडिया योजना यात काय फरक आहे?
Stand-Up India Scheme ही योजना SC/ST आणि महिलांना व्यवसायासाठी कर्ज देण्यासाठी आहे, तर Startup India Scheme ही योजना नवकल्पनाधारित (innovative) उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे.
निष्कर्ष:
भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या स्टँड अप इंडिया या योजनेमुळे देशातील एससी एसटी प्रवर्गातील नागरिकांना व महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दहा लाख ते एक कोटी पर्यंत कर्ज मिळते, या योजनेमुळे केवळ व्यवसायच नव्हे तर रोजगार निर्मितीला ही चालना मिळते ही योजना समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत करते आणि त्यांना आत्मनिर्भर बनवते योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर लाभार्थी स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू करू शकतो,त्यामुळे व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा.