Raj Thackeray Biography In Marathi: मुख्यमंत्री नाही. तो सध्या सत्तेतही नाही. तरीही जेव्हा तो बोलतो, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र थांबून ऐकतो. त्यांच्या सभेतला एक वाक्यांश सोशल मीडिया वर वादळ उठवतो, एक भाषण राजकीय चर्चेची दिशा बदलतं, आणि एक प्रश्न व्यवस्थेला अस्वस्थ करतो . हा प्रभाव आहे फक्त राज ठाकरे यांचा. म्हणूनच त्यांचा Raj Thackeray Biography In Marathi प्रवास हा केवळ राजकारणाचा नाही,तर तो आहे विचारांचा,संघर्षाचा आणि स्वाभिमानचा..
| संपूर्ण नाव ((Full Name) | राज ठाकरे |
| जन्म तारीख (Date of Birth) | 14 जून 1968 |
| वय (Age) | 58 वर्षे |
| वडिलांचे नाव (Father Name) | श्रीकांत केशव ठाकरे |
| आईचे नाव (Mother’s Name) | कुंदा केशव ठाकरे |
| पत्नी (Wife) | शर्मिला ठाकरे |
| मुलांचे नाव (Children) | अमित ठाकरे,उर्वशी ठाकरे |
| धर्म (Religion) | हिंदू |
| पक्षाचे नाव (Party Name) | महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) |
| नेटवर्थ् | लगभग ₹50 करोड़ |
जन्म आणि कुटुंब:
यांचा जीवन प्रवास Raj Thackeray Biography In MArathi मध्ये पुढे बघूया…
14 जून 1968,मुंबईच्या शिवाजी पार्क जावळील एका मराठी कायस्थ कुटुंबात जन्माला आलेल्या एका मुलाचे नव स्वराज ठाकरे असे ठेवल गेल. पुढे हाच स्वराज महाराष्ट्राच्या राजकारणात’राज ठाकरे’ या नावाने ओळखला जाऊ लागला. त्यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धाकटे बंधु, तर आई कुंदा केशव ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांच्या लहान बहीण.
राज ठाकरे यांचे बालपण हे केवळ कुटुंबाटच नव्हे तर, विचारांनी आणि संस्कारांनी ठाकरे घराण्यात घडत गेले होते. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे केवळ राजकरनाशी जोडलेले नव्हते,तर ते एक कार्टूनिस्ट,संगीतकार आणि उर्दू शेरो शायरीत ही पारंगत कलाकार होते. त्यांनी काही मराठी चित्रपटाचीही निर्मिती केली होती.
कला आणि शिक्षण:
राज ठाकरे यांचे शालेय शिक्षण बालमोह विद्या मंदिर,दादर येथे झाले. पुढे त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून त्यांनी पदवी घेतली. वडील आणि काका बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे हेही खूप उत्कृष्ठ कार्टूनिस्ट व चित्रकार आहे. ते जर राजकरणात आले नसते तर काय केले असते ?असा प्रश्न विचारल्यावर त्यांचा एक उत्तर दिले.”कॉलेज च्या काळात मला वाल्ट डिज्नी स्टुडिओसाठी काम करायच होत.”
आजही राज ठाकरे हे फोटोग्राफी,चित्रकला आणि सिनेमा कडे वेगळ्या व भावनिक दृष्टीने पाहतात. त्यांनी आपल्या काकांवर आधारित “केशव ठाकरे”या नावाने एक फोटो-जीवन ही प्रकाशित केली आहे.
कौटुंबिक जीवन
राज ठाकरे यांची पत्नी “शर्मिला ठाकरे”या प्रसिद्ध मराठी रंगमंच व चित्रपट अभिनेता,निर्माता -दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरे यांना एक मुलगा अमित ठाकरे एक मुलगी उर्वशी ठाकरे आहे. राज ठाकरे अनेकदा आपल्या भाषणात कुटुंबाचा उल्लेख करताना दिसले गेले आहे.
राज यांचा राजकारणात प्रवेश:
राज ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश शिवसेने मधूनच झाला. एक काळी त्यांच्याकडे शिवसेनेचे भावी नेते म्हणून पाहिले जात होते,बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण व सभा नियोजन हे राज ठाकरे सांभाळत असे ,
नंतर काळ खूप बदलला, शिवसेनेच्या नेतृत्वचा प्रश्न समोर आल्यावर चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांना पुढे नेल जात असल्याची भावना राज ठाकरे यांच्या मनामध्ये आली. शेवटी वेगळा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना:
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)या नव्या पक्षाची स्थापना 9 मार्च 2006 रोजी केली.
मराठी मानस आणि त्यांचा हक्क हा पक्षाचा केंद्रबिंदू होता. अनेक अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उभ राहुन राज ठाकरे यांची साथ दिली.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत mns ने शिवसेनेची मराठी मते मोट्या प्रमाणात विभागली व त्याचा अप्रत्यक्ष फायदा कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मिळाला. याच निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात व लोकांच्या मनात ठाम पने कोरले गेले.
Raj Thackeray Biography In Marathi त्याची कामे व गुण दाखवण्याचे काम केले आहे.
औद्योगिक व ग्रामीण विकासाचा संकल्प:
राज ठाकरे यांनी केवळ भाषणापूर्ते राजकारण केले नाही , त्यांनी 14 जून 1996 रोजी “शिव उद्योग सेना” स्थापन केली. मराठी तरुणांना रोजगार, स्वयंम रोजगारासाठी कर्ज देण्याचा प्रयत्न केला . याच काळात त्यांनी एक वेगळाच उपक्रम राबवला ,मुंबई मधील अंधेरी स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये माईकल जॅक्सन चा लाईव शो आयोजित केला,भारतातील हा पहिलाच असा कार्यक्रम होता, ज्याचा उद्देश संघटनेसाठी निधी उभारणे हा होता
वाद आणि टीका
राज ठाकरे यांचा प्रवास जितका प्रभावी ,तितकाच वादग्रस्त ही होता, हे Raj Thackeray Biography In Marathi मध्ये स्पष्ट सांगितल आहे,
- उत्तर भारतविरोधी आंदोलन 2008 :2008 साली उत्तर भारतविरोधात झालेल्या आंदोलनामुळे राज ठाकरे देशभर चर्चेत आले होते ,त्यांच्या भाषणामुळे आणि आंदोलनामुळे हिंसाचार झाला,मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे राज ठाकरे यांच्या वर तीव्र टीका झाली.
- रमेश किनी हत्या प्रकरण: 1996 मधील रमेश किनी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र CBI चौकशीत हे प्रकरण आत्महत्या चे असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांची त्या प्रकरणातून सुटका झाली.
- अमिताभ बच्चन आणि कोहिनूर मिल वाद: कोहिनूर मिल जमीन व्यवहार , तसेच लोक प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांच्या रिलीजवरून दिलेल्या धमक्यांमुळे सुद्धा राज ठाकरे वादात सापडले होते.
स्पष्ट वक्तेपणाचे राजकारण:
राज ठाकरे हे राजकारणातील एक वेगळेच व्यक्तिमत्व आहे. ते वक्तृत्व ,कलात्मक दृष्टी,स्पष्ट मत आणि आक्रमक भूमिका यासाठी ते ओळखले जातात,कोणी त्यांना नाकारतो तर कोणी त्यांच्यावर प्रेम करतात पण दुर्लक्ष मात्र कोणी करू शकत नाही. हे आपण या Raj Thackeray Biography In Marathiमध्ये बघितल .
राज ठाकरे वय ?
राज ठाकरे यांचा जन्म 14 जून 1968,मुंबईच्या शिवाजी पार्क जावळील एका मराठी कायस्थ कुटुंबात जन्माला आलेल्या एका मुलाचे नव स्वराज ठाकरे असे ठेवल ग