Prakash Ambedkar Biography:महाराष्ट्रीय तसेच भारतीय राजकारणात काही व्यक्ति अशा असतात की,त्यांच्या नावाची चर्चा जरी सुरू झाली तरी त्यांनी केलेले कामे,त्यांचा त्याग ,आणि गरीब जनतेसाठी दिलेला लढा आपल्या डोळ्यासमोर उभे राहतो . प्रकाश आंबेडकर(prakash ambedkar)त्यांच्या पैकी एक महान लोकप्रिय नेते आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी समाजामध्ये स्वत:ची वेगळी राजकीय ओळख घडवली आहे,व तेही केवळ नावमुळे नाही तर कृती मुळे.
समाजातील वंचित,मागासवर्गीय आणि बहुजन लोकांसाठी लढा देताना त्यांनी सरकारला अनेकदा बिनधास्त प्रश्न विचारले,त्यांच्या भाषणातील आत्मविश्वास ,विचारातील स्पष्टता,आणि निर्णयातील असलेले धाडस दिसून येते,कधी कौतुक तर कधी वादग्रस्त भाषणामुळे ते अनेकदा चर्चेत आले आहे -पण एक गोष्ट मात्र नक्की आहे त्यांनी स्वत:चं काम करण कधी सोडलं नाही .
राजकीय प्रवासात आलेले चढ-उतार,निवडणुकीतील हार-जीत,पक्ष स्थापन करण्याचा निर्णय आणि सामाजिक न्यायासाठी केलेले प्रयत्न या सगळ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळ स्वरूप दिलं आहे,या Prakash Ambedkar Biography लेखा मध्ये आपण त्यांच्या जीवनाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यांच्या विचार सरणी मागचं तत्व,राजकीय वाटचाल आणि समाजासाठी दिलेले योगदान पुढील Prakash Ambedkar Biographyमध्ये पाहू .
| संपूर्ण नाव (FULL NAME) | प्रकाश यशवंत आंबेडकर (PRAKASH AMBEDKAR) |
| जन्म तारीख (DATE OF BIRTHDAY) | 10 मे 1954 |
| वय (AGE) | 71 वर्षे |
| आईचे नाव (MOTHER NAME) | मीरा यशवंत आंबेडकर (MEERA YASHWANT AMBEDKAR) |
| पत्नी (WIFE) | प्रा.डॉ.अंजली प्रकाश आंबेडकर (DR.ANJALI PRAKASH AMBEDKAR) |
| मुलाचे नाव (CHILDREN) | सुजात आंबेडकर (SUJAT AMBEDKAR) |
| टोपण नाव (nikname ) | बाळासाहेब आंबेडकर |
आंबेडकर घराण्यात जन्म .. आणि बालपण:
प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा जन्म 10 मे 1954 मध्ये त्याकाळातील बॉम्बे व आत्ताचे मुंबई मध्ये आंबेडकर घराण्यात झाला,ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांचे सर्वात मोठे नातू ,त्यांच्या वडिलांचे नाव यशवंत बाबासाहेब आंबेडकर व आई चे नाव मररत यशवंत आंबेडकर होते,असे म्हंटल्या जाते की,त्यांचे ‘प्रकाश’ हे नाव त्यांचे आजोबा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवले होते,प्रकाश आंबेडकर यांना दोन लहान भाऊ व एक बहीण सुद्धा आहे भीमराव आणि आनंदराज तसेच बहीण रमाबाई .त्याचा संपूर्ण परिवार बौद्ध धर्माचे पालन करत आहे.
Prakash Ambedkar Biography मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या शिक्षनाची माहिती खालील प्रमाणे :
शिक्षण:
- शालेय शिक्षण 1972 मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे शालेय शिक्षण सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल,वांद्रे,मुंबई येथे पूर्ण केले,व त्यानंतर
- उच्च शिक्षण 1978 मध्ये त्यांनी सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स,मुंबई येथून B.A (बॅचलर ऑफ आर्ट) पदवी मिळवली.
- लॉ डिग्री प्राप्त 1981 मध्ये त्यांनी सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ,मुंबई मधून LLB (बॅचलर ऑफ लॉ) डिग्री प्राप्त केली.
राजकारणातील पहिली एंट्री संघर्ष की,वारसा?
प्रकाश आंबेडकर यांना त्यांच्या परिवरकडून राजनीतीचा वारसा जरी मिळाला असला तरी त्यांनी त्यावर निरभर न राहता स्वत:लोक कल्याणासाठी आपले प्रयत्न सुरू केले,त्यांना त्यांच्या आजोबा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाच्या प्रेरणेमुळे कधी नैराश्य होण्याची गरज पाडली नाही,त्यांनी त्यांची LLB पदवीचे शिक्षण पूर्ण केल्या नंतर राजकारणात प्रवेश केला, Prakash Ambedkar Biography मध्ये त्यांची काही महत्वाची कामे सांगितली आहे.
- त्यांनी सुरुवातीलाच 4 जुलै 1994रोजी भारिपा बहुजन महासंघ ह्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली ,या पक्षाचे मुख्य उद्दिष्टे दलित व मागास वर्गीयांच्या अधिDIकारांसाठी काम करने हा आहे,हा पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाशी प्रेरित होऊन स्थापन केला.
- भारिप बहुजन महासंघ च्या वतीने त्यांनी अकोला महानगर पालिका निवडणुका मध्ये भाग घेऊन बीजेपी ,कोंगेस,आणि शिवसेना यांसारख्या मोठ्या पक्षांच्या विरुद्ध विजय मिळवला,लोकांनी त्यांच्या रणनीती ला ‘अकोला पॅटर्न ‘म्हणून ओळखू लागले.
- ‘अकोला पॅटर्न ‘ हा पॅटर्न दलित आणि मुस्लिम गटाच्या एकतेवर आधारित आहे,अकोला मध्ये स्थानिक संस्था मध्ये सर्वसामान्यांचा समावेश करणे,अकोला शहराच्या विकासावर भर देणे ,सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे.
- भारतीय संसदेचे सदस्य म्हणून काम 1990 ते 1996 या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते.त्यानंतर 1998 मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून आले.1999 मध्ये त्यांनी पुन्हा अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली व जिंकली सुद्धा आणि 1999 ते 2004 पर्यंत लोकसभेचे सदस्य राहिले. प्रकाश आंबेडकर हे 1990 ते 2004 पर्यंत दोन वेळेस राज्यसभा व लोकसभा या दोन्ही सभा ग्रहाचे सदस्य राहिले आहे.
- शेतकरतांसाठी मोर्चा: शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रकाश आंबेडकर यांनी नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढला होता,प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शेतकऱ्यांना मोठा पाठिंबा दिला.या मोर्चाचा उद्देश सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, वनहक्क कायदा लागू करणे,स्वामीनाथन आयोग लागू करणे, काही प्रलंबित माघण्या त्यांनी केल्या. या सर्व मुद्यांवर निर्णय घेण्यासाठी सरकारने एक समिति नेमली व त्या मध्ये प्रकाश आंबेडकर यांचाही समावेश केला. प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाला पाठिंबा दिल्यामुळे इतर सहमत असलेले पक्षाने देखिल त्यांना पाठिंबा दिला त्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला. हा मोर्चा महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनांच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो,ज्यामध्ये प्रकाश आंबेडकरांमुळे अनेक पक्ष आणि नेते सहभागी झाले होते.
- बाबासाहेबांच्या Riddles in Hinduism पुस्तकासाठी मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘Riddles in Hinduism’ या ग्रंथात रामायणाचा नायक राम आणि महाभारताचा नायक कृष्ण असल्या काही मुद्यांवर लिहिले आहे त्यावर 1988 मध्ये वाद निर्माण झाला होता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही ‘सामना’मध्ये ‘रिडल्स राम आणि कृष्ण’ प्रश्नावर महाराष्ट्र पेटवू, असा मथळा छापला होता,त्यावर शिवसेना विरोधात प्रकाश आंबेडकरांनी विरोध दाखवत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला,त्या काळात झालेले हे आंदोलन सर्वात मोठे दलित आंदोलन पैकी एक मानले जाते. या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या संघटणाच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली,या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखानातील वादग्रस्त भाग कायम ठेवण्याचा निर्णय घेन्यात आला. या आंदोलनामुळे प्रकाश आंबेडकर यांची दलित चळवळीतील नेतृत्व शक्ति अधिक स्पष्ट पणे समोर आली.
पुढे त्यांनी दलित आणि ओबीसी समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला. बहुजन महासंघाच्या माध्यमातून त्यांनी दलित,ओबीसी,आदिवसी इतर मागास वर्गीय वंचित समाज घटकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले,त्यांच्या मते समाजातील अनेक घटक ही सामाजिक आर्थिक अन्यायाला बळी जात आहेत,त्या मुळे सर्व वंचित समाजाने एकत्र येऊन आपले हक्क मिळवण्यासाठी लढा दिला पाहिजे. - वंचित बहुजन आघाडीची स्थापना 2018 मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी आपला पूर्वीचा पक्ष भरिप बहुजन महासंघ च्या आधारावर वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली,सुरुवातीला ही आघाडी राजकारणातील काही पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणून तयार करण्यात आली.समाजातील वंचित घटकांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देणे,संविधान आणि सामाजिक न्यायाचे संरक्षण करणे,दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे व मुख्य उद्दिष्टे म्हणजे 2019 ची निवडणूक लढविणे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे केले. त्या वेळी या आघाडीने ALL INDIA MAJLIS-E-ITTEHADUL MUSKIMEEN सोबत युती केली होती.
वैयक्तिक आयुष्य कॅमेऱ्या मागील जीवन:
Prakash Ambedkar Biography मध्ये त्यांचे जीवन कसे आहे हे सांगण्याचे काम केले आहे ,महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या राजकारणात जितके कठोर दिसणारे प्रकाश आंबेडकर आहे तितकेच शांत व साधी राहणीमान असणारे ते नेते आहे,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू,त्यांना वाचनाचा छंद आहे आणि हा छंद देखील आपल्या आजोबांकडून मिळाला आहे , मोठ्या राजकीय घराण्यातून असूनही प्रकाश आंबेडकर यांची जीवनशैली साधी आहे. ते नेहमी सामान्य लोकांशी संवाद करतात.
प्रकाश आंबेडकर यांची मुळे आणि बीज:
Prakash Ambedkar Biography मध्ये त्यांच्या संपूर्ण परिवाराची माहिती दिली आहे.
प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या पत्नी प्रा.डॉ.अंजली प्रकाश आंबेडकर व मुलगा सुजात सोबत असल्याचे छायाचित्र.प्रकाश आंबेडकर यांचे लग्न अंजली मायदेव यांच्याशी झाले आहे. अंजली मायदेव या महाराष्ट्रातील चित्पावन ब्राह्मण कुटुंबातील आहेत.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री नेमक्या कोण?
प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी कोण आहेत?
प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव अंजली आंबेडकर (अंजली मायदेव) आहे. त्या एक माजी प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.अंजली मायदेव या महाराष्ट्रातील चित्पावन ब्राह्मण कुटुंबातील आहेत.
प्रकाश आंबेडकरांचे वडील कोण आहेत?
प्रकाश आंबेडकर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांचे नातू आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव यशवंत आंबेडकर (भैय्यासाहेब) आहे आणि त्यांच्या आईचे नाव मीरा आहे.
प्रकाश आंबेडकर खासदार होते का?
दोन वेळा लोकसभेत आणि एकदा राज्यसभेत भारतीय संसदेचे सदस्य (खासदार) झाले.
प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा कोण आहे?
त्यांचा मुलाचे नाव सुजात आंबेडकर असून तेही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे.
प्रकाश आंबेडकर यांचे वय किती आहे?
यांचा जन्म १० मे १९५४ रोजी झाला आहे.त्यांचे वय ७१ वर्षे आहे.
प्रकाश आंबेडकर यांचे शिक्षण किती आहे?
1978 मध्ये त्यांनी सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स,मुंबई येथून B.A पदवी मिळवली. आणि 981 मध्ये त्यांनी सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ,मुंबई मधून LLB डिग्री प्राप्त केली.