Pradhan Mantri Vidyalaxmi (pm-vidyalaxmi) Scheme:शिक्षणासाठी पैसे नाहीत? सरकार देतंय 0% interest वर लोन लगेच apply करा.

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना (Pradhan Mantri Vidyalaxmi (pm-vidyalaxmi) Scheme) ही योजना उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार कडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे आहे. जेणे करून आर्थिक परिस्थिति मुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण अपूर्ण राहणार नाही.या योजने अंतर्गत लाभार्थी चे घरचे वार्षिक उत्पन्न 8,00,000/- रुपये किंवा त्या पेक्षा कमी असल्यास त्या विद्यार्थ्याला 3% सबसिडी दिली जात आहे. ही योजना सोपी सरळ असून या योजने अंतर्गत विद्यार्थ्याला बिना कोणत्या हमी/गॅरंटी व बिना काही गहाण ठेवता शिक्षण कर्ज दिले जाते.फक्त विद्यार्थी हा भारतामधील 860 नामांकित गुणवत्ता पूर्ण उच्च शिक्षण संस्था (QHEI) मधील कोणत्याही एका संस्थेमध्ये आपल्या योग्यता प्रमाणे प्रवेश प्राप्त करावा लागेल. ही योजना भारत सरकार मधील उच्च शिक्षण विभाग द्वारे केनेरा बँक च्या सांगड्या सह चालवली जात आहे. या (Pradhan Mantri Vidyalaxmi (pm-vidyalaxmi) Scheme) योजनेचा फॉर्म हा ऑनलाइन भरावा लागतो.

(Pradhan Mantri Vidyalaxmi (pm-vidyalaxmi) Scheme) योजनेचे फायदे:

  • क्यू. एच. ई. आय. मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तारण किंवा हमीदाराची गरज नसलेले खास शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • या कर्जाची रक्कम कोणत्याही ठराविक मर्यादेत अडकलेली नसते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे शुल्क आणि इतर आवश्यक खर्च जसे की मेस,वसतिगृह फी,परत मिळणारे व न मिळणारे शुल्क, लॅपटॉप तसेच राहणीमान खर्च यांच्या आधारावर कर्ज दिले जाते.
  • कौटुंबिक उत्पन्न कितीही असले तरी ₹7,50,000 पर्यंतच्या कर्जासाठी भारत सरकारकडून 75% पर्यंत पत हमी दिली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांवरील आर्थिक ताण तनाव कमी होतो.
  • अभ्यासाचा कालावधी आणि त्यानंतरचा एक वर्षाचा स्थगिती कालावधी धरून, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹10,00,000 पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना ₹8,00,000 पर्यंतच्या कर्जावर 3% व्याज सवलतही मिळते.
  • याशिवाय, पी.एम.यू.एस.पी.सी.एस.आय.एस. (Pradhan Mantri Uchch Shiksha Protsahan Credit Subsidy Interest Scheme) योजनेअंतर्गत तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या आणि वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹4,50,000 पर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण व्याज अनुदानाचा लाभ आधीपासून दिला जात आहे.
  • व्याजदरही मर्यादित ठेवण्यात आला असून तो संबंधित बँकेच्या बाह्य बेंचमार्क कर्जदर (EBLR) + 0.5% इतकाच असतो. जर विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि स्थगिती कालावधीत व्याजाची नियमित भरपाई केली, तर त्यांना आणखी 1% पर्यंत अतिरिक्त सवलत मिळू शकते.
  • परतफेडीबाबतही सोय करण्यात आली असून, मोरेटोरियम कालावधी वगळता कर्ज फेडण्यासाठी तब्बल 15 वर्षांचा कालावधी दिला जातो.
  • व्याज सवलतीची रक्कम थेट लाभार्थ्याच्या पीएम-विद्यालक्ष्मी डिजिटल रुपी अॅप (apps) (CBDC वॉलेट) मध्ये जमा केली जाते. नंतर लाभार्थीने अॅपवरून परतावा केल्यानंतर ती रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाते.

पात्रता:

(Pradhan Mantri Vidyalaxmi (pm-vidyalaxmi) Scheme) या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे गरजेचे आहे,त्या अटी खालील प्रमाणे:

  1. सर्वप्रथम, अर्ज करणारा विद्यार्थी भारतीय नागरिक असावा.
  2. त्याने भारतातील निवडलेल्या 860 गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण संस्थांपैकी (QHEI) एखाद्या संस्थेत मेरिटच्या आधारावर प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.व्यवस्थापन कोटा किंवा अशा कोणत्याही विशेष कोट्यातून घेतलेला प्रवेश मान्य केला जाणार नाही.
  3. व्याज सवलतीचा लाभ घ्यायचा असल्यास, विशेषतः 3% सवलतीसाठी, विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹8,00,000 पर्यंत असणे आवश्यक आहे.
  4. अर्जदाराने आधीपासूनच कोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती, व्याज अनुदान किंवा फी परतफेड योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
  5. अभ्यास करताना विद्यार्थ्याने मध्येच कोर्स सोडू नये, तसेच शिस्तभंग किंवा शैक्षणिक कारणांमुळे त्याला संस्थेतून काढून टाकले गेलेले नसावे.
  6. दुसऱ्या वर्षापासून व्याज अनुदान सुरू राहण्यासाठी विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरीही समाधानकारक असणे आवश्यक आहे.
  7. याशिवाय, पदवी, पदव्युत्तर किंवा एकात्मिक अभ्यासक्रमासाठी अर्जदाराला फक्त एकदाच व्याज अनुदान आणि पत हमीचा लाभ मिळू शकतो.

दर्जेदार उच्च शिक्षण संस्था (QHEI) म्हणून कोणत्या संस्था पात्र ठरतात:

या(Pradhan Mantri Vidyalaxmi (pm-vidyalaxmi) Scheme) योजने साठी खालील संस्था पात्र ठरतात:

  • शिक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध होणाऱ्या NIRF(National Institutional Ranking Framework) च्या ताज्या क्रमवारीनुसार, एकूण किंवा श्रेणी/क्षेत्रनिहाय यादीत टॉप 100 मध्ये असलेल्या उच्च शिक्षण संस्थांना या योजनेत पात्रता दिली जाते.
  • शिक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध होणाऱ्या NIRF (National Institutional Ranking Framework) च्या ताज्या क्रमवारीनुसार, एकूण किंवा श्रेणी/क्षेत्रनिहाय यादीत टॉप 100 मध्ये असलेल्या उच्च शिक्षण संस्थांना या योजनेत पात्रता दिली जाते.
  • उर्वरित सर्व उच्च शिक्षण संस्था भारत सरकारच्या प्रशासनाखाली आहेत.
  • महत्त्वाचे म्हणजे,परदेशातील शैक्षणिक संस्थांचे भारतातील कॅम्पस,भारतातील संस्थांचे परदेशातील कॅम्पस किंवा पूर्णपणे परदेशी शैक्षणिक संस्था यांचा या योजनेत समावेश केला जाणार नाही.

कागदपत्रे:

  1. आधार कार्ड.
  2. पॅन कार्ड.
  3. विद्यार्थी चा पत्त्याचा पुरावा.
  4. मागील पात्रतेच्या गुणपत्रिका.
  5. प्रवेश परीक्षेचा निकाल पत्रक.
  6. प्रस्ताव पत्र (संस्थेकडून, शुल्क रचनेसह).
  7. उत्पन्नाचे प्रमाणपत्र.

अर्ज प्रक्रिया :

या (Pradhan Mantri Vidyalaxmi (pm-vidyalaxmi) Scheme) योजने मध्ये अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून सरळ आणि सोपी आहे. यामध्ये सर्वात अगोदर नोंदणी आणि नंतर अर्ज भरावा लागतो.

नोंदणी प्रक्रिया (Registration)

  1. pmvidyalaxmi.co.in या लिंक वर क्लिक करून प्रधानमंत्री विद्यालयलक्ष्मी (पीएम-विद्यालयलक्ष्मी) योजनचे(Pradhan Mantri Vidyalaxmi (pm-vidyalaxmi) Scheme) अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या.
  2. त्यानंतर वरच्या मेनूमध्ये जाऊन लॉगिन-स्टुडेंट लॉगिन हा पर्याय निवडापुढच्या स्क्रीनवर तुम्हाला खाते तयार करा असा पर्याय दिसेल — त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही “विद्यार्थी नोंदणी”पेजवर पोहोचाल.
  3. या योजनेत नोंदणी करताना आधारच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण केली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, व्याज अनुदान आणि पत हमी यांसारखे फायदे मिळू शकतात. पात्र असल्यास पुढे व्याज अनुदानासाठीही अर्ज करता येतो.
  4. नोंदणी फॉर्म भरताना तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ही आवश्यक माहिती द्यावी लागते. त्यानंतर OTP द्वारे मोबाईल आणि ईमेलची पडताळणी केली जाते.
  5. यानंतर तुम्हाला एक पासवर्ड तयार करावा लागेल. तो किमान 8 अक्षरांचा असावा आणि त्यामध्ये मोठी व लहान अक्षरे, अंक आणि विशेष चिन्हांचा समावेश असणे गरजेचे आहे
  6. सर्व माहिती भरल्यानंतर पासवर्डची पुष्टी करा, कॅप्चा टाका आणि terms and privacy policy मान्य करा. शेवटी “Submit” वर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा.

अर्ज प्रक्रिया:

pmvidyalaxmi.co.in या लिंक वर क्लिक करून प्रधानमंत्री विद्यालयलक्ष्मी (पीएम-विद्यालयलक्ष्मी) योजनचे (Pradhan Mantri Vidyalaxmi (pm-vidyalaxmi) Scheme) अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या.

  1. त्यानंतर वरच्या मेनूमध्ये जाऊन लॉगिन हा पर्याय निवडा. पुढे तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी (जो User ID म्हणून वापरला जातो) आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  2. यानंतर कॅप्चा कोड भरून terms and privacy policy मान्य करा आणि लॉगिन करा. तुमच्या मोबाईल किंवा ईमेलवर आलेला OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करा.
  3. “विद्यार्थ्यांच्या मुखपृष्ठावर”, “शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करा” वर क्लिक करा, तुम्हाला योजनेच्या ऑनलाईन अर्जाच्या फॉर्मवर नेले जाईल.
  4. फॉर्म भरताना सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा आणि मागितलेली कागदपत्रे योग्य फॉरमॅट आणि साईजमध्ये अपलोड करा. त्यानंतर ड्रॉपडाउनमधून तुमची बँक आणि शाखा निवडा.
  5. संपूर्ण माहिती पुन्हा एकदा तपासा, काही चूक असल्यास दुरुस्त करा. शेवटी terms and conditions मान्य करून “Final Submit” वर क्लिक करा. अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल.

हे ही वाचा: Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana:महाराष्ट्रातील युवकांसाठी सुवर्ण योजना 10,000 रु विद्यावेतन सुद्धा?

हे ही वाचा: Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana:नवीन सरकारी योजना 2026.

कर्ज अर्जाची स्थिती:

  • पीएम-विद्यालक्ष्मी खात्यात लॉग इन केल्यानंतर “Students Home Page” मध्ये जा आणि मेनूमधील “Track Loan Application” या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर यादीतून तुमचा अर्ज क्रमांक निवडा.
  • स्क्रीनवर तुम्हाला अर्जाची सध्याची स्थिती दिसेल, जसे पुनरावलोकनाखाली”, “मंजूर”, “वितरित करा.

(Pradhan Mantri Vidyalaxmi (pm-vidyalaxmi) Scheme) मध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

या (Pradhan Mantri Vidyalaxmi (pm-vidyalaxmi) Scheme) योजने मध्ये काही महत्वाचे प्रश्न पुढील प्रमाणे:

प्रधानमंत्री विद्यालयलक्ष्मी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडथळे येऊ नयेत हा आहे. त्यासाठी शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि सुलभ करून देण्यात आली आहे.

प्रधान मंत्री विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेली सरकारी योजना आहे.या योजनेत तारण किंवा हमीदाराची गरज नसते, तसेच पात्र विद्यार्थ्यांना व्याजावर सवलत आणि पत हमीचा लाभ देखील दिला जातो.

आम्हाला १००% शैक्षणिक कर्ज मिळू शकते का?

प्रधानमंत्री विद्यालयलक्ष्मी (पीएम-विद्यालयलक्ष्मी) योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना 100% शैक्षणिक कर्ज मिळू शकते. मात्र,

विद्या लक्ष्मी एज्युकेशन लोन चांगले आहे का?

ही योजना विद्यार्थ्यांसाठी चांगली आहे कारण एकाच पोर्टलवर अनेक बँकांमधून कर्जासाठी अर्ज करता येतो आणि प्रक्रिया सोपी व ऑनलाइन आहे

Leave a Comment