Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana:केंद्र शासनाच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी श्रमयोगी मानधन योजना,म्हणजेच श्रमयोगी पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.ज्यामध्ये असंघटित कामगार ज्यांचा कुठल्याही प्रकारे पीएफ कापला जात नाही किंवा ज्यांची भविषयामद्धे कसलीही सुरक्षा नाही अशा कामगारांना 60 वय वर्षानंतर तीन हजार रुपये (3000/-) महिना पेन्शन ची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. ज्या प्रमाणे शेतकऱ्यांसाठी शासनाकडून किसान मानधन योजना राबवली जाते त्याच प्रमाणे ही श्रमयोगी मानधन योजना राबवली जाते.ही योजना एलआयसी(LIC)द्वारे प्रकाशित केली जात आहे, त्यामुळे या योजने मध्ये विश्वासहार्यता आणि आर्थिक स्थिरता दिसून येते.
ही योजना नेमकी कुणासाठी?
ही Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana योजना असंघटित कामगार म्हणजेच घरगुती कामगार,रस्त्यावरील विक्रेते,मध्यान्ह भोजन कामगार,डोक्यावर वोझे वाहणारे,विटभट्टी कामगार,चांभार,कचरा वेचणारे,धोबी,रिक्षा चालक,भूमिहीन मंजूर,स्वयंरोजगार करणारे,शेतमजूर,बांधकाम कामगार,हातमाग कामगार,चंबड्याचे काम करणारे,हकश्राव्य कामगार,आणि असेच इतर कामगार.
Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana योजनेची उद्दिष्टे :
ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली असून तिचा मुख्य उद्देश भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षा व आर्थिक लाभ देण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे.
पात्रता (Eligibility):
| वयोमार्यादा | 18 ते 40 वर्षे |
| उत्पन्न | मासिक 15,000/- किंवा त्यापेक्षा कमी |
| असंघटित कामगार | रस्त्यावरील विक्रेते,मध्यान्ह भोजन कामगार,डोक्यावर वोझे वाहणारे,विटभट्टी कामगार,चांभार,कचरा वेचणारे,धोबी,रिक्षा चालक,भूमिहीन मंजूर,स्वयंरोजगार करणारे,शेतमजूर,बांधकाम कामगार,हातमाग कामगार,चंबड्याचे काम करणारे. |
| अपात्र | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(EPF),कर्मचारी राज्य विमा महामंडळ(ESIC),किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना(NPS)अंतर्गत समाविष्ट नसावे. आयकर दाता नसावा. कोणत्याही शासकीय निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत नसावे. |
आवश्यक कागदपत्रे:
- आधारकार्ड .
- आयएफएससी (IFSC)सह बचत बँक खाते किंवा जन धन खाते.
- मोबाईल नंबर (आधारकार्ड आणि बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक).
अर्ज प्रक्रिया :
पात्र उमेदवार मानधनपोर्टल द्वारे नोंदणी करू शकतात किंवा जवळील सामान्य सेवा केंद्रावर (CSCs)वर देखील नोंदणी करू शकता.
Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana पोर्टल:https://maandhan.in/
Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana योजनेचा लाभ :
- किमान हमी पेन्शन : Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana योजना धारकाला वयाच्या 60 वर्षांनंतर दर महा 3,000/-रुपये शासनाकडून सुरू करण्यात येते.
- सरकारी योगदान :भारत सरकारकडून कामगारांना योगदानाईटकेच योगदान म्हणजे 1:1 या प्रमाणात देते.
- ऐच्छिक(स्व:इच्छा):ही योजना ऐच्छिक असून म्हणजेच स्व:इच्छे ची असून,कामगारांना त्यांच्या गरजेनुसार आणि आर्थिक क्षमते नुसार योगदान देण्याची मुभा देते.
- कुटुंबाला निवृत्तीवेतन:लाभार्थी निधन झाल्यास,जोडीदाराला निवृत्तीवेतनाच्या 50 टक्के रक्कम म्हणजे 1500/-रुपये कौटुंबिक निवृत्ती वेतन म्हणून सरकार कडून जोडीदाराला मिळते,हे कौटुंबिक निवृत्ती वेतन फक्त जोडीदारलाच (पती /पत्नी) मिळते.
योगदान भरण्याची रचना:
नोंदणी करण्याचे वेळी कामगाराच्या वयानुसार योगदान भरण्याची रक्कम बदलते,कामगार जितक्या कमी वायमद्धे नोंदणी करेल तितकाच त्याला मासिक योगदान कमी भरावे लागेल.
| प्रवेश करण्याचे वय | मासिक योगदान भरण्याची रक्कम | सरकारकडून मिळणारे समान योगदान |
| 18 वर्षे | 55/-रुपये | 55/-रुपये |
| 20 वर्षे | 65/-रुपये | 65/-रुपये |
| 25 वर्षे | 80/-रुपये | 80/-रुपये |
| 30 वर्षे | 105/-रुपये | 105/-रुपये |
| 35 वर्षे | 150/-रुपये | 150/-रुपये |
| 40 वर्षे | 200/- रुपये | 200/- रुपये |
योजनेतून बाहेर पडण्याच्या तरतुदी:
- कामगार / लाभार्थी हा योजनेच्या चालू काळामध्ये बाहेर निघल्यास देखील लाभ सुनिश्चित
- 10 वर्षापूर्वी योजना सोडल्यास:जर एखादा लाभार्थी 10 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच योजनेतून बाहेर पडल्यास भरलेली रक्कम बचत बँकेच्या व्याजदारां प्रमाणे सरकार कडून परत मिळते.
- 10 वर्षानंतर पण 60 वर्षापूर्वी बाहेर पडल्यास: कामगाराला त्याच्या योगदानाचा वाटा व निधीने प्रत्यक्षात कामावलेले किंवा जमा झालेले व्याज या मध्ये जास्त रक्कम ज्या मध्ये असेल ते लभार्थीला मिळणार.
- 60 वर्षानंतर मृत्यू झाल्यास: 60 वर्षानंतर मृत्यू झाल्यास निवृत्ती वेतणाच्या 50 टक्के रक्कम जोडीदाराला कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळेल.
- लाभार्थीचा आणि त्याच्या जोडीदाराच्या मृत्यू नंतर : संपूर्ण मूळ रक्कम निधीमध्ये परत केली जाईल.
- थकबाकी असल्यास: जर एखाद्या कामगाराने वर्गणी नियमित पणे न भरल्यास त्यांना शासनाने ठरवलेल्या दंड शुल्कासह(असल्यास) संपूर्ण रक्कम नियमित भरण्यास परवानगी दिली जाईल.
Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana हा एक सरकार कडून सुरू करण्यात आलेला लाखों असंघटित कामगारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणारा एक महत्वाचा उपक्रम आहे,या उपक्रमामुळे लाभार्थी ला समाजामध्ये सेवानिवृत्ती नंतर सन्मानपूर्वक जीवन जगण्यास मोठ्या प्रमाणात मदत मिळते.ही योजना भारतातील असंघटित कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कमी उत्पन्न असलेल्या लोकांना वृद्धापकाळात आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना एक चांगला पर्याय आहे.
जर तुमचे वय 18 ते 40 वर्षे आहे, उत्पन्न ₹15,000 पेक्षा कमी आहे आणि तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करत असाल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
हे ही वाचा: Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana:महाराष्ट्रातील युवकांसाठी सुवर्ण योजना 10,000 रु विद्यावेतन सुद्धा?
नवीन योजनेच्या माहिती साठी whatsup चॅनेल जॉइन करा :
joinप्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना म्हणजे काय?
ही भारत सरकारची एक पेन्शन योजना आहे जी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा.
Pmsym ची पेन्शन योजना काय आहे?
PMSYM म्हणजे गरीब आणि असंघटित कामगारांसाठी सुरक्षित पेन्शन योजना, जिथे तुम्ही थोडे पैसे भरता आणि सरकार तुमच्यासोबत सारखीच रक्कम भरते आणि 60 वर्षा नंतर दर महा ₹3000 मिळतात.
pmsym ची स्थिती कशी तपासावी?
मानधन श्रम योगी योजना पोर्टल:https://maandhan.in/ ह्या पोर्टल वर जाऊन लॉगिन करून तपासू शकतात.
पीएम श्रम योगी मानधन योजनेसाठी कोण पात्र आहेत?
गरीब किंवा मध्यमवर्गीय असंघटित कामगार असल्यास,
वय 18–40 आहे आणि उत्पन्न ₹15,000 पेक्षा कमी असल्यास.
मानधन योजनेचे मासिक योगदान किती आहे?
मानधन योजनेचे मासिक योगदान वयोगटानुसार 55 ते 200 रुपये पर्यंत आहे.
पीएम श्रम योगी मानधन योजनेचा टोल फ्री क्रमांक कोणता आहे?
ग्राहक सेवा क्रमांक 1800 2676 888 आहे.
मी माझ्या पेन्शनची १००% रक्कम काढू शकतो का?
होय,तुम्ही तुमच्या पेन्शनची १००% रक्कम काढू शकता.