Eknath Shinde:Biography,वय,पत्नी,मुले,कुटुंब,संपत्ती,चारित्र्य आणि…

Eknath Shinde Biography:रिक्षा ड्रायवर ते मुख्यमंत्री;

या चारित्ऱ्या मध्ये आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे( eknath shinde )यांच्या बद्दल माहिती बघणार आहोत,ज्यांनी महाराष्ट्रातील गरीब जनते साठी अनेक विकासाचे कामे केली योजना सुरू केल्या,सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे (eknath shinde) हे एके काळी उदर-निर्वाह साठी रिक्षा चालवत होते,बियर च्या कंपनी मध्ये काम करत होते, रिक्शा चालवणारा सुद्धा एक राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे दाखऊन देणारे म्हणजे एकनाथ शिंदे होय.

संपूर्ण नाव ((Full Name)एकनाथ संभाजी शिंदे [Eknath Shinde]
जन्म तारीख (Date of Birth)9 फेब्रुवारी 1964
जन्म स्थानदरेतांब,जिल्हा सातारा [Daretamb,district Satara]
वय (Age)62 वर्षे [62 years ]
वडिलांचे नाव (Father’s Name)संभाजी नवलू शिंदे [Sambhaji Navalu Shinde]
आईचे नाव (Mother’s Name)गंगूबाई संभाजी शिंदे [Gangubai Sanbhaji Shinde]
पत्नी (Wife)लता शिंदे [Lata Eknath Shinde]
मुलांचे नाव (Children)आयु.डॉ. श्रीकांत शिंदे [dr.shrikant shinde]
स्व. दिपेश ,स्व.शुभदा [late dipesh,shubhda]
धर्म (Religion)हिंदू [Hindu]
पक्षाचे नाव (Party Name)शिवसेना [shivsena]
पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण [dhanushyabaan]
नेटवर्थ्अंदाजे ₹37.69 करोड़

बालपण आणि कुटुंब:

एकनाथ शिंदे(eknath shinde) यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी त्यांच्या आजोळी ,अहिर, तालुका- महाबळेश्वर,जिल्हा-सातारा येथे झाला.पण त्यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात “दरेतांब” नावाचे आहे . त्यांच्या वाडिलांचे नाव संभाजी नावालू शिंदे व आई चे नाव गंगूबाई संभाजी शिंदे तसेच त्यांना एक भाऊ व बहीण सुद्धा आहे त्यांचे नाव प्रकाश शिंदे व सुनीता शिंदे (साळुंके)आहे. त्यांच्या वडिलांचा त्यावेळी प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती होता त्यामुळे त्यांची घरची परिस्थिति हलकीची होती. त्यामुळे
एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी व उदर निर्वाह साठी सताऱ्यावरून ठाणे ला स्थलांतर केले.

56 व्या वर्षी डिग्री,एकनाथ शिंदे(Eknath Shinde)यांचे शिक्षण:

शालेय शिक्षण :

  • एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे शहरातील किसननगर क्रमांक.3 येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक.23 येथे झाले.
  •  त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण हे ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले,परंतु त्यांना आर्थिक परिस्थिति मुळे 11 वी ला असताना शिक्षण सोडावे लागले होते . 
  • उच्च शिक्षण: त्यांच्या मध्ये असलेल्या शिकण्याची आवडी मुळे त्यांनी राजकारणात आल्यानंतर 2020 मध्ये,वयाच्या 56 व्या वर्षी कला(B.A)क्षेत्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली.
  •  डॉक्टर ऑफ लेटर्स: मार्च 2023 मध्ये, डी. वाई. पाटिल विश्वविद्यालय द्वारे त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लेटर्स) या मानाच्या उपाधी ने सन्मानित करण्यात आले.
  • डिप्लोमा: त्यांनी जर्नलिज्म एंड मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा आणि ह्यूमन राइट्स मध्ये कोर्स केला आहे त्यामध्ये त्यांना सर्टिफिकेट सुद्धा प्राप्त झाले आहे.

राजकारणात प्रवेश:

एकनाथ शिंदे रिक्षा चालक:

यांनी 11वी ला शिक्षण सोडल्या नंतर त्यांनी घरची परिस्थिति सुधारवण्यासाठी छोटी मोठी कामे केली त्यामध्ये त्यांनी बियर च्या कंपनी मध्ये काम केले,व हाताला जे मिळेल ते काम केले,
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी रिक्षा चालवली.

बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव व दिघे यांचे मार्गदर्शन:

त्या काळामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निडर व कडक भाषणा मुळे तरुण पिडी अत्यंत प्रभावी झाली होती. त्याकाळी ठाण्यामध्ये शिवसेना चे जिल्हाप्रमुख म्हणून आनंद दिघे हे होते,
समाजामध्ये होणाऱ्या अन्यायाविरोधात व मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेना चा दबदबा ठाण्यामध्ये तयार झाला होता,त्यामुळे तरुण पिढी त्यांच्याकडे आकर्षित होत होती व शिवसेनेशी जोडत जात होती त्यातील एक म्हणजे एकनाथ शिंदे.

ठाणे राजकारणातील सुरुवात:

त्या वेळी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी एकनाथ शिंदे(eknath shinde) यांची 1984 ला ठाण्यातील किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली,ही नियुक्ती आनंद दिघे यांच्या द्वारे करण्यात आली अशा प्रकारे त्यांनी शिवसेने मध्ये प्रवेश केला. गरीब लोकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, ठाण्यातील समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात आंदोलने करणे यातही एकनाथ शिंदे यांचा महत्वाचा वाटा असायचा.श्री.आनंद दिघे यांच्या नेतृत्वा मध्ये अनेक आंदोलने एकनाथ शिंदे यांनी पार पाडली,1986 ला सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना बेल्लारी येथील तुरुंगात 40 दिवस कारावास भोगावा लागला होता.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची राजकीय टाइमलाइन

  • नगरसेवक म्हणून निवड 1997: एकनाथ शिंदे यांनी 1997 ला ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी अर्ज केला आणि निवडणूक लढवली व त्यात ते निवडून आले,ही त्यांना पहिल्यांदा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली होती.
  • ठाणे सभागृह पदी निवड 2001: ठाणे महानगरपालिकेच्या सभागृह पदासाठी 2001 मध्ये त्यांची निवड करण्यात आली,पुढे त्यांनी सलग तीन वर्ष 2001 -2004 पर्यंत या महानगरपालिकेच्या सभागृह पदावर राहिले.
  • विधानसभा निवडणूक 2004: त्यांनंतर 2004 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ठाणे मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याकरिता शिवसेनेकडून प्रथम वेळेस त्यांना संधी दिली,आणि त्यामध्ये सुद्धा ते विजयी झाले,एकनाथ शिंदे हे विधानसभा ची निवडणूक लढण्याकरीता त्यांनी अगोदरच खूप प्रयत्न केले होते.
  • ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती 2005: बाळासाहेब ठाकरे यांनी 2005 मध्ये त्यांना ठाणे येथील शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची निवड करण्यात आली,या आधी आमदार पदा सोबत जिल्हाप्रमुख म्हणून या दोन्ही पदावर शिवसेनेचे कोणीही नव्हते,
  • विधानसभा निवडणूक 2009 व 2014 : 2009 मध्ये आणि 2014 मध्ये सुद्धा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली व त्यात सुद्धा त्यांना विजय मिळाला.
  • 2014 ते 2019: या पाच वर्षामध्ये त्यांना काही पदाचा कामे पार पाडावी लागली, ऑक्टोबर 2014 ते डिसेंबर 2014 या काळामध्ये त्यांनी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम बघितले, त्यांनंतर 2014 -2019 मध्ये त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नियुक्ती,
    याच काळामध्ये त्यांना ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून निवड करण्यात आली,
  • विधानसभा निवडणूक 2019: 2019 मध्ये ते सलग चौथ्या वेळेस विधानसभेत निवडून आले,
  • 2019 मध्येच ते महाराष्ट्र राज्य सरकारकडून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची निवड झाली,व नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री म्हणून सुद्धा नियुक्ती झाली.
  • ग्रहमंत्री(कार्यवाहक)नियुक्ती: 28 नोवेंबर 2019 ते 30 डिसेंबर 2019 या काळामध्ये त्यांची गृहमंत्री (कार्यवाहक) म्हणून नियुक्ती केली.
  • पालकमंत्री: 2020 मध्ये त्यांना पुन्हा ठाण्याचे पालक मंत्री म्हणून नेमण्यात आले.
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2022-2024: एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व त्यांनी 30 जून 2022 ते 5 डिसेंबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.
  • विधानसभा निवडणूक 2024: 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते पुन्हा निवडून आले.
  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 2024: एकनाथ शिंदे यांनी 5 डिसेंबर2024 ला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या समोर शपथ घेतली.

Eknath Shinde यांनी मंत्री म्हणून केलेली कामे:

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण आणि विस्तारीकरण–  मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड प्रकल्प,आणि मेट्रो जाळ्याचा विस्तार यांसारख्या मोठ्या एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी चालना दिली. तसेच ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या कामालाही वेग दिला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा: केंद्र सरकारकडून महराष्ट्राच्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ (Classical Language) चा दर्जा मिळवा म्हणून पाऊल उचलले व त्यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये मंजूरी मिळवली.

त्यांनी काही योजना सुद्धा सुरू केल्या ज्यामध्ये त्याचा सामान्य जनतेला प्रत्यक्षात व अ प्रत्यक्षात फायदा झाला.
शासन आपल्या दारी: सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लोकांना कार्यालयात जावे लागू नये, यासाठी ही योजना सुरू केली. या उपक्रमातून 5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यात आली.
माझा लाडका भाऊ योजना: 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6000 रुपये, डिप्लोमा धारकांना 8000 रुपये आणि पदवीधरांना 10000 रुपये विद्यावेतन देणारी ही कौशल्य प्रशिक्षण योजना आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना: 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी 3000 रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
१ रुपयात पीक विमा: शेतकऱ्यांच्या हितासाठी केवळ एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतला.

मित्रा (MITRA): महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (MITRA) ची स्थापना केली, ज्याला जागतिक बँकेचे सहकार्य लाभले आहे.
गुंतवणूक आणि रोजगार: 2026 च्या अखेर पर्यंत महाराष्ट्रात अंदाजे 2.96 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणून 3 लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. या मध्ये महाराष्ट्रातील बेरोजगार तरुनांना याचा फायदा मिळेल.

एकनाथ शिंदे यांचे जीवन:

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आपल सर्व आयुष्य हे जन कल्याणासाठी घालवले,सुरुवातीला त्यांनी ठाणे मुंबई च्या विकासासाठी लढा दिला व नंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांसाठी.. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे व सरल आहे.

पत्नी आणि कुटुंब:

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या पत्नी लता शिंदे आहे,त्यांच्या कुटुंबा मध्ये सध्या त्यांच्या पत्नी लता शिंदे, त्यांचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे हे व्यवसायाने अस्थिरोगतज्ज्ञ (Orthopaedic Surgeon) असून सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांची सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्यासह शिंदे यांचे कुटुंब ठाण्यातील लुईसवाडी येथील ‘शुभदीप‘ बंगल्यात राहतात.
शुभ दीप त्यांच्या बंगल्याचे नाव त्यांच्या स्व. मुलांवर ठेवले आहे,2 जून 2000 मध्ये एकनाथ शिंदे(eknath shinde) यांच्या आयुष्यात एक मोठा आघात झाला होता.सातारा येथे झालेल्या नौकाविहाराच्या वेळी एका अपघातात त्यांचा मुलगा दीपेश (11 वर्षे) आणि मुलगी शुभदा (7वर्षे) यांचा बुडून मृत्यू झाला या दुःखातून सावरून त्यांनी स्वतःला समाजसेवेसाठी झोकून दिले.

हे ही वाचा : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री – सुनेत्रा पवार नेमक्या कोण?

एकनाथ शिंदे वय?

एकनाथ शिंदे(eknath shinde) यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला त्यांचे वय 62 वर्षे आहे.

एकनाथ शिंदे शिक्षण ?

त्यांच्या मध्ये असलेल्या शिकण्याची आवडी मुळे त्यांनी राजकारणात आल्यानंतर 2020 मध्ये,वयाच्या 56 व्या वर्षी कला(B.A)क्षेत्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली.

एकनाथ शिंदे संपर्क कार्यालय ?

एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मुख्य कार्यालय ठाण्यात आहे. मुख्य निवासी व संपर्क पत्ता: शुभदीप बंगलो, लुईसवाडी सर्व्हिस रोड, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र

एकनाथ शिंदे वाडिलांचे नाव ?

त्यांच्या वडीलांचे नाव संभाजी नवलू शिंदे [Sambhaji Navalu Shinde] आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल:

वाचा

नागपूर च्या गल्लीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंतचा अविश्वसनीय प्रवास …

Leave a Comment