Rohit Pawar Biography:वय,शिक्षण,कुटुंब,संपत्ती आणि अविश्वसनीय राजकीय प्रवास

Rohit Pawar Biography: रोहित राजेंद्र पवार हे केंद्रीय कृषिमंत्री तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे नातू व स्व.अजितदादा पवार यांचे पुतणे असल्यामुळे यांना आणखी वेगळ्या ओळखेची गरज नाही,त्यांनी कमी वयातच बारामती अग्रो लिमिटेड च्या माध्यमातून व्यवसायामध्ये पाऊल ठेवले, त्यानंतर त्यांनी आपल्या विकासकामांच्या आवडी मुळे राजकारणात उतरून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून राम शिंदे यांचा पराभव करत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. आता सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाकडून कर्जत-जामखेड मतदारसंघाचेआमदार आहेत. रोहित पवार यांनी ग्रामीण भागातील लोकांचा विकास, ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगार संधी निर्माण करण्यावर भर दिल्या मुळे ते महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय नेते होत आहे.

संपूर्ण नाव ((Full Name)रोहित पवार (Rhohit Pawar)
जन्म तारीख (Date of Birth)29 सप्टेंबर 1985 (29 sep 1985)
वय (Age)41 वर्षे
वडिलांचे नाव (Father’s Name)राजेंद्र दिनकरराव पवार (Rajendra Dinkarrao pawar)
आईचे नाव (Mother’s Name)सुनंदा पवार (Sunanda Pawar)
पत्नी (Wife)कुंती पवार (Kunti Pawar)
मुलांचे नाव (Children)आनंदिता (Anandita),शिवांश (Shivansh)
धर्म (Religion)हिंदू (Hindu)
पक्षाचे नाव (Party Name)राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress Party)
नेटवर्थ् 106 करोड़+

रोहित पवार यांच्या जीवनातील महत्वाचे भाग आज आपण Rohit Pawar Biography मध्ये पाहणार आहोत.

बालपण:

रोहित पवार यांचा जन्म 29 सप्टेंबर 1985 रोजी बारामती मध्ये पवार घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजेंद्र दिनकर पवार व आईचे नाव सुनंदा पवार आहे,त्यांचे आजोबा अप्पासाहेब पावर हे शरदचंद्र पवार यांचे भाऊ आहे,रोहित पावर यांचा जन्म पवार कुटुंबात झाल्यामुळे त्यांच्यावर बालपणीच त्यांचे आजोबा शरद पवार यांचे राजकारणातील संस्कार झाले.

शिक्षण:

  • रोहित पवार यांचे प्राथमिक शिक्षण विद्याप्रतिष्ठान,बारामती,मध्ये पूर्ण झाले.
  • उच्च शिक्षण २००७ मध्ये मुंबई विद्यापीठातून ‘बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ (BMS) मध्ये पदवी मिळवली.
    ते लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार मेहनती होते,त्यांनी घेतलेल्या बी. एम.एस पदवीचा फायदा त्यांना चांगलाच मिळाला.

कामास सुरुवात:

राजकारणात येण्यापूर्वी रोहित पवार यांनी उद्योग क्षेत्रात व शेती व्यवसायामध्ये आपली आवड दाखवत मोठे काम केले व महाराष्ट्रातील तरुणांना शेतीबद्दल एक प्रेरणा दिली जेणे करून महाराष्ट्रातल्या शेतकरी तरुणाने शेतीव्यवसायमद्धे आपले लक्ष केंद्रित करून स्वत:ची व महाराष्ट्राची प्रगती करावी.
रोहित पवार यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बारामती अग्रो प्रा. लि टे ड च्या CEO पदाचा पदभार स्वीकारून कामास सुरुवात केली.
Baramati Agro Pvt. Ltd. ची माहिती:ही कंपनी 14 जानेवारी 1988 मध्ये रोहित पवार यांचे आजोबा पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार यांनी स्थापन केली,या कंपनी चे मुख्यालय महाराष्ट्रातील बारामती येथे आहे. ही एक प्रमुख कृषी-आधारित कंपनी आहे. सध्या रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली, ही कंपनी पोल्ट्री, साखर, पशुखाद्य, दुग्धजन्य पदार्थ, फळे-भाजीपाला आणि इथेनॉल उत्पादनात कार्यरत असून ‘Delicious’ ब्रँडद्वारे प्रक्रिया केलेले चिकन उत्पादने विकत आहे.
तसेच 2018 ते 2019 मध्ये रोहित पवार Indian Sugar Mills Association (ISMA) चे अध्यक्ष झाले, ते (ISMA) चे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख सुद्धा आहे.

राजकारणात प्रवेश:

  • रोहित पवार यांनी 2017 मध्ये राजकारणात प्रवेश केला,त्यांनी पुणे जिल्हा परिषद निवडणूक 2017 लढवली व प्रचंड मताने विजय मिळवत राजकारणात प्रवेश केला,
  • त्यांनंतर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक 2019 खूप चर्चेत होती, कारण की,त्यावेळी कर्जत-जामखेड मतदार संघ हा गेल्या 25 वर्षापासून भाजपा च्या ताब्यात होता व भाजपला तेथे पराजित करणं खूप कठीण होते,या निवडणुकीमध्ये भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षा मधील कॅबिनेट मंत्री राम शिंदे हे विरोधी उमेदवार म्हणून उभे होते,रोहित पवार यांनी त्यांचा पराभव करून भाजपा चा बालेकिल्ला तोडला.
    रोहित पवार यांनी निवडणूक लढवत असताना मतदार संघातील आर्थिक सामाजिक समस्या आणि विकासाचे प्रश्न व अडचणी समजून घेतल्या व त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी त्वरित ‘कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन (KJIDF)’ हा एक उपक्रम राबावला .

निवडणुकीनंतर पुढच काम?:

  • रोहितने सृजन फाउंडेशनची स्थापना:या फाऊंडेशनचा मुख्य हेतु हा महाराष्ट्रातील तरुणांचा सर्वांगीण विकस घडून आणणे होता,या फाउंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर सृजन भजन स्पर्धा,दुर्गरज किल्ला बांधणी स्पर्धा,क्रिकेट स्पर्धा व महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले,
  • गेल्या काही वर्षात रोहित पवार यांनी जिल्हा परिषद ,विधानसभा आणि पंचायत निवडनुकांसाठी खूप मेहनीतीने प्रचार केला. त्यांच्यामुळे कर्जत -जामखेड मंतदारसंघाला महाराष्ट्र च्या राजकीय व सामाजिक नकाशावर वेगळी ओळख निर्माण करून दिली.
  • दुष्काळात पाणी पुरवठा: रोहित पवार यांचे आजोबा डॉ. अप्पासाहेब पवार यांनी लिहिलेल्या ‘पाणी’ या पुस्तकात त्यांनी पाण्याचे महत्व स्पष्ट करून सांगितले आहे,रोहित पवार यांनी त्यातून प्रेरना घेऊन दुष्काळच्या काळात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या काळात रोहित पवार यांनी कर्जत जामखेडची तहान भागवली. बारामती अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून त्यांनी अहमदनगर आणि साताऱ्यातील बीड आणि मानखटाव या भागात दररोज १७० टँकर शुद्ध पाण्याचे वाटप केले.
  • रोहित पवार यांची निवड 2022 मध्ये Maharashtra Cricket Association च्या अध्यक्षपदी झाली.त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात क्रिकेटच्या विकासासाठी नवीन स्पर्धा आणि सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले.

कुटुंब आणि वैयक्तिक जीवन:

कुटुंब आणि वैयक्तिक जीवन Rohit Pawar Biography मध्ये संविस्तर देण्याचा प्रयत्न केला आहे,
शिवाजी विद्यापीठाचे पाहिले कुलगुरू व उच्च शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेल्या प्रशंसनीय कार्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले शिक्षण संचालक म्हणून प्रशासकीय सेवेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार यांचे रोहित पवार हे नातू ,
तसेच रोहित पवार यांचे वडील, श्री. राजेंद्र अप्पासाहेब पवार, जे स्वतः एक कृषीतज्ज्ञ होते, त्यांनी ‘बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड’ आणि ‘कृषी विकास ट्रस्ट’ चे काम व्यवस्थित रित्या चालू ठेवण्यास योगदान दिले,त्यामुळे राजेंद्र पवार यांना महाराष्ट्र सरकार कडून ‘महाराष्ट्र कृषि रत्न पुरस्कार’देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
रोहित पावर यांच्या आईसाहेब सुनंदा पवार हया सामाजिक कार्यकर्त्या व एक स्वयंपूर्ण उद्योजक देखील आहेत,त्यांनी संपूर्ण आयुष्य महिला सक्षमी करणासाठी काम केले,त्यांनी अनेक स्वयंसेवा गट आणि रोजगार च्या संधी उपलब्ध करून देणारा ‘भीमथडी जत्रा’हा कार्यक्रम सुरू केला.
रोहित पवार यांच्या पत्नी श्रीमती कुंती पवार ह्या अर्थशास्त्रज्ञ आहे,त्यांना दोन आपत्य आहे,आनंदिता आणि शिवांश असे त्यांचे नाव आहे.कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि सामाजिक कामात नेहमी तयार राहणे हे त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे.

this emage credited by zeenews.india.com

Rohit Pawar Biography रोहित पवार परिवार छायाचित्र

Rohit Pawar Biography मधील स्वमत: रोहित पवार यांनी त्यांच्या एक मुलाखती मध्ये बोलत असताना सांगितले की ,”मी जो पर्यंत जीवंत आहे तो पर्यंत कर्जत-जामखेड कडूनच निवडणूक लढवत राहणार करण की इथल्या मातीने मला लढायला शिकवलं आहे,आणि आता मला शरद पवार साहेब यांनी देखील विरोध केला तरी मी येथूनच लढणार,ही काळ्या दगडा वरील रेख आहे.”
राष्ट्रवादी कोंग्रेस या गटामधून अजित पवार हे बाहेर निघाले असता शरद पवार यांना रोहित पवार यांनी पाठिंबा दिला, व अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्याच्या मृत्यू ची योग्य चौकशी करण्यात यावी यासाठी ते लढा देताना दिसत आहे,
रोहित पवार यांच्या अश्या कामा बद्दल निष्टा पाहून सध्या रोहित पवार यांच्याकडे जनता भावी मुख्यमंत्री म्हणून बघत आहे.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री – सुनेत्रा पवार नेमक्या कोण?

वाचा


Rohit Pawar Biography मध्ये विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न उत्तरे-

रोहित पवार हे कोण आहेत?

रोहित पवार यांचा जन्म 29 सप्टेंबर 1985 रोजी बारामती,महाराष्ट्र येथे राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार यांच्या पवार कुटुंबामध्ये झाला. ते दिनकरराव गोविंदराव पवार यांचे नातू आणि भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे नातू आहेत.

रोहित पवार कोणत्या मतदारसंघात आहेत?

रोहित राजेंद्र पवार हे एक राजकारणी आहेत आणि महाराष्ट्रातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.

रोहित पवार आणि अजित पवार यांचे नाते

रोहित पवार आणि अजित पवार हे नात्याने काका-पुतणे आहेत. शरद पवार हे अजित पवारांचे काका आहेत, तर रोहित पवार हे शरद पवारांचे नातू (अप्पासाहेब पवार यांचे नातू) आहेत.

अजित पवार आणि शरद पवार यांचे नाते काय आहे?

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, स्व.अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत

रोहित पवार यांचे वय किती आहे?

रोहित पवार यांचा जन्म 29 सप्टेंबर 1985 रोजी बारामती मध्ये झाला ,त्यांचे वय 41 वर्षे आहे

रोहित पवार यांचे शिक्षण किती आहे ?

रोहित पवार यांनी त्यांचे शालेय शिक्षण बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मधून पूर्ण केले. त्यांनी २००७ मध्ये मुंबई विद्यापीठातून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (BMS) ही पदवी प्राप्त केली आहे

रोहित पवार नेटवर्थ

रोहित पवार नेटवर्थ 106 करोड़+ आहे .

Leave a Comment