Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana:महाराष्ट्रातील युवकांसाठी सुवर्ण योजना 10,000 रु विद्यावेतन सुद्धा?

mukhyamantri yuva karya prashikshan yojana ही महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित पण बेरोजगार असलेल्या तरूणांना नोकरी साठी आर्थिक विकासासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्या हेतूने महाराष्ट्राचे तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून,देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात सुरू आहे, या योजनेत पात्र झालेल्या युवक-युवतील महाराष्ट्र शासन कार्यालये तसेच शासन मान्यता प्राप्त असलेली स्थानीक स्वराज्य संस्था मध्ये कामावर आधारित प्रशिक्षण देण्यात येईल. व तसेच पात्र असलेल्या तरुणांना mukhyamantri yuva karya prashikshan yojana अंतर्गत 10,000/- रुपये प्रती महिना पर्यंत विद्या वेतन देण्यात येईल.

mukhyamantri yuva karya prashikshan yojana

योजनेची उद्दिष्टे :

ही योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील वाढती सुशिक्षित बेरोजगारी कमी करण्यासाठी व चांगल्या नोकऱ्या आणि जीवन शैली उंचावण्यासाठी योग्य ते कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचा हेतु आहे.
महाराष्ट्रामध्ये बरेच विद्यार्थी व विद्यार्थिनी ना पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण करून ही कामाच्या अनुभवा अभावी नोकरीपासून वंचित रहाव लागते,त्यामुळे त्यांना कामाचे प्रत्यक्ष ज्ञान,व्यावसायिक कौशल्ये मिळावे हा या योजने मागील मुख्य उद्देश आहे.

पात्रता (Eligibility):

mukhyamantri yuva karya prashikshan yojana साठीची पात्रता खालील प्रमाणे :

शिक्षण 12वी उत्तीर्ण/ पदवीधर /डिप्लोमा /ITI
वय 18 ते 35 वर्षे
रहिवासी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक
रोजगार स्थिति बेरोजगार असणे आवश्यक

आवश्यक कागदपत्रे:

mukhyamantri yuva karya prashikshan yojana साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे :

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • शाळेचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ओळखपत्र
  • मोबाईल नंबर आधार नंबर व बँकेशी संलग्न केलेला असावा (दोन्हीकडे एकच मोबाइल नंबर असावा)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

योजनेचा लाभ :

पात्र झालेल्या उमेदवाराला प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून पुढील प्रमाणे विद्यावेतन मिळते ,

  • पदवीधर-द्वीपदवीधर – रू. 10,000/- प्रती महिना.
  • ITI-डिप्लोमा – रू.8,000/- प्रती महिना.
  • 12 वी पास – रू. 6,000/- प्रती महिना.

योजनेचे फायदे:

  1. प्रत्यक्ष कामाचा अनुभव- भविष्यातील दैनंदिन कामाची सवय लागत जाते.
  2. मानधनाची सुविधा-प्रशिक्षण काळात प्रशिक्षणाबरोबरच आर्थिक मदत मिळते.
  3. कौशल्य विकास- विद्यार्थ्यांना आपल्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यास मदत होते,आपल्या कामात वापरात यणारे साहित्य जेसे संगणक ,काही नवीन आधुनिक मशीन इत्यादी चा अनुभव मिळतो .
  4. रोजगार संधी मध्ये वाढ.
  5. आत्मनिर्भरटेकडे वाटचालीस मदत -युवक स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सक्षम .
  6. ग्रामीण तरुणांसाठी संधी -शहरातील युवकांबरोबर गावातील युवकांना ही चांगल्या कामाची संधी प्राप्त होते.

अर्ज प्रक्रिया :

mukhyamantri yuva karya prashikshan yojanaसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धती द्वारे पूर्ण केली जाते.

  • नोंदणी (Registration): CMYKPY या योजनेची अधिकृत वेबसाइट ला भेट द्या आणि ‘उमेदवार नोंदणी’ (Candidate Registration) करावी.
  • संकेत स्थळ : CMYKPY पोर्टल https://www.cmykpy.mahaswayam.gov.in
  • प्रोफाइल तयार करणे: शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि आधार सह स्वत: ची प्रोफाइल पूर्ण करा.
  • आवडीचे पदे निवडणे: पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रांतील (सरकारी/निमसरकारी/खाजगी) रिक्त पदांची माहिती घ्या आणि तुमच्या आवडीच्या पदासाठी अर्ज करा.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कोणासाठी आहे?

ही योजना महाराष्ट्रातील 18 ते 35 वर्षे वयोगटातील बेरोजगार व गरीब युवकांसाठी आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी किती आहे ?

प्रशिक्षणाचा कालावधी 6 ते 12 महिने आहे .

प्रशिक्षणादरम्यान मानधन मिळते का?

होय, पात्रतेनुसार दरमहा मानधन दिले जाते.

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे का?

होय,अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

ग्रामीण भागातील युवक अर्ज करू शकतात का?

होय, ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील युवक अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे?

किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्जासाठी शुल्क आहे का?

अर्जासाठी कोणतेही शुल्क नसते (शासन नियमांनुसार).

प्रशिक्षणानंतर कायम नोकरी मिळते का?

कायम नोकरीची हमी नसली तरी अनुभवामुळे रोजगार संधी वाढते.

एका व्यक्तीला किती वेळा लाभ मिळू शकतो?

एकदाच लाभ दिला जातो.


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने ची वेबसाइट कोणती आहे?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने ची वेबसाइट https://cmykpy.mahaswayam.gov.in ही आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना फॉर्म लास्ट date काय आहे?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना फॉर्म लास्ट date सरकार द्वारे वेळो वेळी वाढवली जात आहे.

mukhyamantri yuva karya prashikshan yojana ही महाराष्ट्रातील तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिलेल्या सुवर्णसंधीन पैकी एक संधी आहे. प्रथम बारावी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या युवती व युवकांसाठी ही योजना खूप महत्वाची व उपयुक्त ठरते. गरीब व गरजू युवकांना कामाचा अनुभव, आर्थिक सहाय्य आणि कौशल्य विकास या तिन्ही गोष्टींचा फायदा या योजनेत पाहायला मिळतो. त्यामुळे या योजनेस पात्र झालेल्या युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात या mukhyamantri yuva karya prashikshan yojana योजने द्वारे आजच करावी.

Leave a Comment