Sunetra Pawar Biography In Marathi :सुनेत्रा पवार यांना नवीन ओळखेची गरज नाही,हया माजी स्व.अजित दादा पवार यांच्या पत्नी व शरद पवार यांच्या सूण. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची धुरा सांभाळून स्वत: महाराष्ट्राच्या विकासाचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेणाऱ्या व्यक्तिमत्त्व म्हणजेच सुनेत्रा अजित पवार. प्रसिद्ध राजकीय कुटुंबाशी त्यांचा संबंध असला तरी त्यांची ओळख फक्त त्या नात्यापूरती मर्यादित नाही. समाजातील महिलांसाठी,ग्रामीण भागातील कुटुंबासाठी आणि आणि शिक्षण-आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेली कामे त्यांच्या कार्य शैली ची साक्ष देते.
त्यांच्या जीवन प्रवासकडे पाहिल्यास,कुटुंबाची परंपरा,सामाजिक जाणीव आणि स्वत:ची कार्यतत्परता त्यांचा संगम दिसून येतो,म्हणूनच Sunetra Pawar Biography In Marathi ही केवळ एक राजकीय घराण्यातील स्त्री ची कथा नसून जबाबदारी स्वीकारून शांत पणे कार्य करणाऱ्या व्यक्ति ची वास्तविक प्रेरणादायी कहाणी आहे.
Sunetra Pawar Biography In Marathi मध्ये तकत्या त्या द्वारे थोडक्यात माहिती:
| संपूर्ण नाव: | सुनेत्रा अजित पवार (sunetra ajit pawar) |
| वडिलांचे नाव (father’s name): | स्व.बाजीराव पाटील (Bajirao Patil) |
| आईचे नाव (mother’s name): | शारदाबाई जगताप(shardabai jagtap) |
| पतीचे नाव (husbend’s name): | अजित पवार (ajit pawar) |
| मुलांचे नाव (children’s name): | जय पवार,पार्थ पवार (jay pawar,parth pawar) |
हे ही वाचा : Devendra Fadnavis Biography In Marathi:नागपूर च्या गल्लीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंतचा अविश्वसनीय प्रवास …
बालपण आणि शिक्षण :
सुनेत्रा पवार यांचे बालपण आणि शिक्षण माहिती Sunetra Pawar Biography In Marathi मध्ये खाली देण्यात आली आहे,
सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 मध्ये महाराष्ट्रातील धारशिव (उस्मानाबाद)येथे झाला,त्यांचा जन्म राजकीय आणि सार्वजनिक सेवा करणाऱ्या कुटुंबात झाला. त्यांच्या वडीलाचे नाव बाजीराव पाटील होते,ते स्थानिक पातळीवर राजकीय कार्यात सक्रिय होते,तसेच त्यांचे भाऊ पदामसिंग पाटील हे ही राजकरणातच होते .
सुनेत्रा पवार यांचे बालपण महाराष्ट्रातील धारशिव(उस्मानाबाद) परिसरातच गेले,त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळा तेर येथे पूर्ण केले . आणि त्यानंतर पुढे ऱ्यांनी S.B. arts and commerce college aurangabad ,येथून B.COM ची पदवी मिळवली. शिक्षण सुरू असतानाच त्यांना गरजू लोकांची मदत करण्याची प्रेरणा मिळाली.
कामास सुरुवात :
- सुनेत्रा पवार केवळ अजित पवार यांच्या पत्नी म्हणून प्रसिद्ध नाही तर त्यांनी स्वत:समाजिक आणि पऱ्यावरिय कामातून लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास जिंकला.
- त्यांनी Environmental forum of india(पर्यावरणीय मंच)स्थापन केले,जे ग्रामीण भागात पर्यावरण सजक्ता आणि टिकाऊ उत्पन्नावर काम करते.
- त्यांनी बारामतीतील काटेवाडी गाव पर्यावरण पूरक(eco-villege) मॉडेल मध्ये विकसित केले,स्वच्छता,पानी व्यवस्थापन आणि जैविक शेतीला प्रोत्साहन दिले.
- त्यांचे कार्यक्षेत्र शिक्षण,महिला सक्षमीकरण आणि समाजिक विकासाला जोडलेले आहे.
- त्यांनी बारामती टेक्सटाइल कंपनीच्या चेअरमन म्हनुन कार्य पार पाडली.
- Environmental forum of india(पर्यावरणीय मंच) मध्ये मुख्यअधिकारी म्हणून देखील काम बघत आहे.
त्यांनी राजकारणात प्रवेश कसा केला आपण Sunetra Pawar Biography In Marathi मध्ये पुढे बघूया,
राजकारणात प्रवेश:
सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्य म्हणून राज्यसभेच्या खासदार या पदापासून राजकारणात प्रवेश केला.
अजित पवार यांच्या निधनानंतर 31 जानेवारी 2026 पासून त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पदभार स्वीकारला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून इतिहास देखील रचला.
उपमुख्यमंत्री पदावर सुरू केलेली कार्य:
सध्याच्या काळात सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्या नंतर त्यांनी महत्वाच्या विभागाची जबाबदारी हाती घेतली आहे, ज्यात स्टेट एक्साइज, क्रीडा व तरुण कल्याण, तसेच अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभाग यांचा समावेश आहे .हया जबाबदऱ्या त्यांच्या हातात देण्यात आल्या आहे. ज्या त्या राज्याच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये काम करण्याच्या धोरणांशी जोडलेल्या आहेत.
त्यानंतर त्यांनी अल्पसंख्यांक विभागाला काटेकोर पने व्यवस्थापित करण्याचे आदेश दिले आहेत , हे निर्णय शासन पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरले आहे.
सुरू केलेले उपक्रम:
- साखर कांडी मंजुरांच्या मुलांसाठी 11 हॉस्टेल मंजूर: सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्ह्यातील साखरकांडी मंजुरांच्या मुलांसाठी 11 नवीन हॉस्टेल केले आहेत ,जे त्यांच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षित निवासासाठी उपयुक्त ठरतील. हे होस्टेल्स पाटोडा,कैज,पारली,गेवराई,माजलगाव आणि बीड मुख्यालयात उभारण्यात येतील,या योजना साखरकांडी मंजुरांच्या सामाजिक व शैक्षणीक विकासाला चालना देतील.
- जिल्हा विकास योजनांची मंजूरी: सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्हा नियोजन व विकास परिषदेच्या (DPDC) बैठकीत 1032.88 कोटी च्या विभागीय विकास आराखड्याला मंजूरी दिली आहे ,यात ग्रामीन विकास,आरोग्य ,शिक्षण ,वाहतूक,शहरी पायाभूत सुविधा या क्षेत्रातील महत्वाच्या प्रकल्पाचा समावेश आहे,
- अल्पसंख्यांकांच्या कल्यानाच्या कामाला प्राधान्य: उन्हाळ्यातील मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी अल्पसंख्यांक विभागाच्या कार्यप्रणालीला अधिक पारदर्शक आणि लोकांपर्यंत पोहचणारी बनवण्याचे निर्देश दिले आहेत . तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिक्षण कर्जाची मर्यादा वाढवली आणि विविध अल्पसंख्यांक संस्था व वक्फ बोर्ड यांच्या भरती प्रक्रियेवर लक्ष्य केंद्रित केले आहे.
Sunetra Pawar Biography In Marathi मध्ये त्यांची कामे बघूया.
सुनेत्रा पवार (उपमुख्यमंत्री)यांची अधिकार व कामे:
उप मुख्यमंत्री ही पद राज्यासारकरच्या कार्यामध्ये मुख्यमंत्री यांना मदत करणारे व मुख्यमंत्री गैरहजर असताना शासन कार्याचे नेतृत्व करणारे वरिष्ठ मंत्री पद आहे ,या पदावर असताना सुनेत्रा पवार राज्यशासनाच्या निर्णय प्रक्रियेत बजावत आहे.
तसेच उपमुख्यमंत्री यांची कामे Sunetra Pawar Biography In Marathi मध्ये सविस्तर पणे सांगितली आहे.
राज्य एक्साइज (excise)विभाग:
- मद्य निर्मिती आणि विक्री व कर धोरण यांचे समतोल ठेवणे.
- राजस्व उत्पन्नाचे महत्वाचे स्रोत म्हणून एक्साइस धोरणे आणि अमलबजावणी वर नियंत्रण करणे .
- या विभागाच्या माध्यमातून सरकारची महसूल प्राप्ती नियंत्रित होते आणि मदयविक्री नियमांचे पालन सुनिक्षित होते.
क्रीडा आणि युवक कल्याण विभाग(Sports and Youth Welfare):
- राज्यातील क्रीडा कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी.
- गावस्तरीय ,जिल्हास्तरीय शाळा,महाविद्यालय क्रीडा सुविधांचा विकास.
- युवकांसाठी कल्याणकारी योजना आणि संधी उपलब्ध करणे.
- तरुण पिढीला खेळ,आरोग्य आणि करियर संधि प्रधान करणे या विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
मायनॉरिटी विकास व वक्फ विभाग(Minority Development and Waqf):
- लघु समुदयच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी योजना राबवणे.
- लघु समूहानच्या शिक्षण,रोजगार व कल्याण योजनांचा विस्तार.
- वक्फ बोर्डशी संबंधित प्रशासन.
या विभागातून अल्पसंख्यांक समुदायाचे संशक्तीकरण आणि त्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांची अमलबजावणी केली जाते.
Sunetra Pawar Biography In Marathi मध्ये काही विचारले जाणारे साधारण पण महत्वाचे प्रश्न
सुनेत्रा पवार यांचे वय किती आहे?
सुनेत्रा पवार यांचे वय 62 वर्ष आहे.
सुनेत्रा पवार यांचे शिक्षण किती आहे?
सुनेत्रा पवार यांचे शिक्षण बी.कॉम (Bachelor of Commerce) पर्यंत झालेले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून ही पदवी प्राप्त केली आहे.
सुनेत्रा पवार यांचे वडिलांचे नाव काय आहे?
सुनेत्रा पवार (माहेरचे नाव पाटील) यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री Padamsinh Bajirao Patil हे आहे.
सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रासाठी सत्तेत नसताना व असताना महत्वाची कामे केली आहे हे दाखवण्याचे काम Sunetra Pawar Biography In Marathi मध्ये केले आहे.